Home महाराष्ट्र आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय- शरद पवार

आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय- शरद पवार

अहमदनगर :  एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड यांना लागवला आहे. माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

यशवंत भांगरे माझ्या अगोदर 5 वर्ष अगोदर विधानसभेत होते. ते मला ज्येष्ठ होते. अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे याचा मोठा सहभाग होता, असं पवार म्हणाले.

अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत  आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहका-यांच्या अंगात यायला लागलं,  असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“केंद्र सरकारचे कान उपटून हातात द्यायला बाळासाहेब हवे होते”

नवी मुंबईत भाजपला झटका; भाजपच्या ‘या’ नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला भाजपकडून 100 कोटींची ऑफर; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण”