आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : शिवसेनेसोबत बंडखोरी कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते, आमदार आणि खासदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला.
शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी एक मोठा दावा केला आहे.
हे ही वाचा : राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
जे आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. आता तेच आमदार उद्धव ठाकरेंकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. असा दावा वैभव नाईक यांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळत आहे. त्यांची मलिन झालेली प्रतिमा आणि उद्धव ठाकरेंचे सरकार पाडल्याबद्दल जनतेमध्ये संतप्त भावना आहे. त्यामुळे हे आमदार परत यायला तयार असल्याचा दावा वैभव नाईकांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
उध्दव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; ठाकरे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! शिंदे गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
चेन्नईवर गुजरात भारी; शुभमनच्या झंझावातामुळे गुजरातचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय