Home महाराष्ट्र “महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता, म्हणूनच आरक्षण गेलं”

“महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता, म्हणूनच आरक्षण गेलं”

जळगाव : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा केला. यानंतर ते विविध नेते मंडळींना भेटले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटत 5 गोष्टी सांगितल्या. तसेच 7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या 5 गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही. तसेच 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धार संभाजीराजे छत्रपतींनी बोलून दाखवला. यावरून भाजप आणि सत्ताधारी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशात भाजप खासदार गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

आघाडी सरकार आणि वकील आपली बाजू मांडण्यास कमी पडले. तीन पक्षाचं सरकार असल्याने त्यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादविवाद आणि मतभिन्नता आहे. मंत्रिमंडळातील जवळपास अर्धे मंत्री या आरक्षणाच्या विरोधात आहेत. ते आरक्षण देऊ नको असं म्हणत आहेत. त्यामुळेच आरक्षण गेल्याचं गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता. त्यामुळेच हे आरक्षण गेलं असल्याचा आरोप गिरीश महाजनांनी यावेळी केला. ते जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आले- पंकजा मुंडे

‘क्या हुवा तेरा वादा जयंतराव जी’, जयंत पाटलांचा व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

“ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द हे भाजपचे पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”

अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर- किरीट सोमय्या