सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही- अजित पवार

0
169

मुंबई : सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था होऊन जाते, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.

बोलण्याची संधी मिळाली की, मुनगंटीवार नेहमी सरकार पाडणार किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणार अशी वक्तव्य करत असतात. सत्ता गेल्यामुळेच त्यांना वैफल्य आलं आहे. तसेच परळीत धनंजय मुंडे निवडून आले पण त्यांच्या पक्षाच्या पंकजा मुंडे यांना कोणी पाडले याची चर्चा पूर्ण राज्यभर आहे., असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, भाजपमधील अनेकांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही तर काही जण नेमके पराभूत झाले, असा टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“रंगीला गर्ल तब्बल 12 वर्षांनी करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण”

नागपुरमध्ये भाजपला खिंडार; 31 नेते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“बाॅलिवूडचे मोठे निर्माते संजय लिला भन्साळी यांना कोरोनाची लागण”

माही इज बॅक! धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; पाहा फोटो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here