भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा

0
536

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी भाजपवर निशाणा साधला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भूमिका मांडली.

भाजपच्या नगरसेवकांना व्यक्तीस्वांतत्र्य नाही. त्यांची पक्षात घुसमट झाली आहे. येत्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक भाजपमधील नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा संजोग वाघेरे यांनी केला.

भाजपच्या नगरसेवकांवर दडपण असून त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र नाही. त्यामुळे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. अशी माहिती संजोग वाघेरे यांनी दिली.

दरम्यान, चांगली कामगिरी करणाऱ्या नगरसेवकाला प्रवेश देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचेही संजय वाघेरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

‘संजय राऊतांनी आता राजकारण सोडावं’; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

पालकमंत्री उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर; नितेश राणेंची टीका

भाजपला मोठा दिलासा; 12 निलंबित आमदारांबाबत निवडणूक आयोगाचा ‘हा’ मोठा निर्णय

शिवसेनेचं काहीही झालं तरी चालेल पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, हा तर…; दरेकरांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here