भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या मंत्र्याचं वक्तव्य

0
525

वर्धा : भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांना लवकरच पक्षात प्रवेश देण्यात येईल, असं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. ते वर्ध्यात माध्यमांशी बोलत होते.

भाजपचे नेते हे केवळ राष्ट्रवादीच्याच नव्हे तर काँग्रेस आणि शिवसेनेच्याही संपर्कात आहेत. त्यामुळे पुढील काळात पुण्यात जसा पक्षप्रवेश झाला तसं या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असं अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पैकी ज्या पक्षात ज्या भाजप नेत्यांना जायचंय त्या पक्षात नेत्यांना प्रवेश दिला जाईल, असंही अनिल देशमुख म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

जयंत पाटील म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचंय; यावर अजित पवार म्हणाले…

“शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे, पण…”

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव; शिवसैनिक कर्नाटक पोलिसांना भिडले

इथे तांडव का नाही?; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here