आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सोबत बैठक झाली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला शरद पवार यांची साथ आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे.
हे ही वाचा : आशिष शेलार तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा टोला
ममतादीदी काल मुंबईत आल्या. त्यांनी काही भेटीगाठी घेतल्या. या सर्व घडामोडींमध्ये एक लक्षात येतंय की काँग्रेसला बाजूला ठेवून नॉन काँग्रेस विरोधी पक्षांची एक अलायन्स करण्याचा प्रयत्न ममतादीदी करत आहेत. त्याला पवारांची साथ दिसत आहे. त्यावर काल काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आमच्याशिवाय कोणतीही आघाडी यशस्वी होऊ शकत नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा हा अंतर्गत सामना आहे. तो अंतर्गत सामना पूर्ण झाल्यावर आमच्याशी काय लढायचं ते ठरवतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“आगामी निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत; ‘या’ मोठ्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अखेर रूग्णालयातून डिस्चार्ज; रूग्णालयातून ‘वर्षा’वर
“कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं दु:खद निधन”