आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या अस्तित्वावरच प्रश्नच चिन्ह उपस्थित केला. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एनडीएच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण केले आहेत. एनडीए तरी कुठे अस्तित्वात आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे.
ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट झाली. पण, या क्षणी कोणतीही आघाडी सक्रिय दिसत नाही. यूपीए दिसत नाही. एनडीएही नाही. एनडीए तर संपलेली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा : राष्ट्रवादीचा भारिपला मोठा खिंडार; भारिपच्या 23 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
शरद पवार आणि ममता बॅनर्जी काही करत असेल तर आम्ही त्याकडे डोळसपणे पाहतो. हे अनुभवी लोकं आहेत. काय करायचं आणि काय नाही हे त्यांना माहीत आहे. नेता कोण हा विषय नाही. तर समर्थ पर्याय देणं हे महत्त्वाचं आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेसला वगळून पवारांच्या साथीने आघाडी निर्माण करण्याचा ममतादीदींचा प्रयत्न”
आशिष शेलार तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा टोला
“आगामी निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत; ‘या’ मोठ्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर”