आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर ममता बॅनर्जी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटाबाबतची माहिती दिली.
हे ही वाचा : “शिवसेनेत पक्षप्रवेशाचं वादळ; वैभववाडीत अनेक कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
राजकीय हेतूनेच ममता बॅनर्जी या शिवसनेच्या नेत्यांशी भेटल्या असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा झाली असून येत्या निडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीयदृष्टया ही भेट महत्वाची मानल्या जाते. कारण शरद पवार यांच्याएवढी राजकीय उंची असलेल्या त्या सध्या एकमेव नेत्या आहेत, त्यांचा राजकीय अनुभवदेखील प्रगल्भ आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील चर्चा देशाच्या राजकरणासाठी नवी दिशा देणारी ठरेल, असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचा शिवसेनेला दे धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा
“काँग्रेसची मोठी राजकीय खेळी; गोव्यात भाजप आणि तृणमूलला दिला मोठा धक्का”
“लगीनघाई बरी नाही; नवरा-नवरीच्या झालेल्या फजितीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल; पहा व्हिडिओ”