मला आता फोन कर, मी तुमच्यासाठी कपडे काढेन; अभिनेत्री पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा

0
428

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. एका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन राज कुंद्रा यांना ही अटक केली आहे.

राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. अशातच अभिनेत्री पूनम पांडे हिने राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका देखील केली आहे. यात पूनमने अनेक खुलासे करत राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनी विरोधात काही गंभीर आरोप केले आहेत.

राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने मला जबरदस्ती एका करारावार साईन करण्यास भाग पाडले होते. त्यांच्या मागणीनुसार मला पोजींग करावी लागेल अन्यथा ते माझ्या वैयक्तिक गोष्टी लीक करतील, अशी धमकीच मला त्यांनी दिली होती, असा आरोप पूनमने केला आहे. तसेच मी करारावर साईन करण्यासाठी तयार नव्हते त्यावेळी यांनी माझा पर्सनल मोबाईल नंबर एका मेेसेजसोबत लीक केला होता. या मेसेजमध्ये लिहीलं होतं की, मला आता फोन करा, मी तुमच्यासाठी कपडे काढेन. यानंतर खूप लोक मला फोन करून नको त्या गोष्टींची मागणी करु लागले. तसेच काहींनी मला अश्लील फोटो देखील पाठवण्यास सुरुवात केली, असं देखील पूनम पांडेनं म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करून ठेवणार आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

“चिपळूणमध्ये पूर परिस्थिती आवाक्याबाहेर, सरकारने तातडीने लक्ष घालून लोकांचे जीव वाचवण्याची गरज”

…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?; चित्रा वाघ यांचा सवाल

“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here