शिंदेना मुख्यमंत्री करणं हा फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक, की शिवसेना संपवण्याचं षडयंत्र?; राष्ट्रवादीचा सवाल

0
318

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं हे फडणवीसांचं मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे यांच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचं सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण, मात्र शिवसेना पक्षप्रमुख शपथविधीच्या कार्यक्रमाला जाणार का?

दरम्यान, आज संध्याकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे एकटे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

शिवसेना आमदारांचा जल्लोष; गोव्याच्या हॉटेलमध्ये फुल सेलिब्रेशन

मोठी बातमी! आजपासून महाराष्ट्रात शिंदे सरकार; आज सायंकाळी 7 वाजता होणार शपथविधी? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here