आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान शिदे सांगलीत असताना काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात या भेटीचे कुठलेही नियोजन नव्हते. मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक थेट भारती हॉस्पिटलकडे रवाना झाला आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्यासोबत बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे सांगलीत राजकीय भूकंप होणार?, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
हे ही वाचा : शिंदे गटात सामील झालेले ‘हे’ आमदार परतीच्या वाटेवर?; “महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख” म्हणून केला उद्धव ठाकरेंचा उल्लेख
दरम्यान, भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. तसेच शिंदे यांच्या भेटीनंतर कदम आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करणार का?, य़ाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाणी पातळीत ‘इतक्या’ फुटांनी वाढ, एनडीआरएफची टीम सांगलीत होणार दाखल
मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; रक्षाबंधनाला असंख्य महिलांनी धरला मनसेचा झेंडा
पात्रता नसेल म्हणून…; मंत्रीमंडळ विस्तारावरुन पंकजा मुंडेंची नाराजी पुन्हा उघड