आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका, नगरपंचायत पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून भाजपला पराभवाचा धक्का दिला आहे. मराठवाड्यातील एकूण 23 नगरपंचायती आणि काही पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं असून त्याचे निकालही जाहीर झाले आहेत.
हे ही वाचा : “नगरपंचायत, महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडीने मारली बाजी; भाजपला पराभवाचा धक्का”
सिल्लोड नगर परिषदेच्या एका प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या फातीमाबी पठाण जब्बार खान या विजयी झाल्या आहेत. तर नांदेड वाघाळा महापालिकेच्या एका प्रभागातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या मुस्काना सय्यद या विजयी झाल्या आहेत.
वार्ड क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार पूजा आनंदा ढोके या 279 मतांनी विजयी झाल्या. तर वार्ड क्रमांक आठमध्ये शिवसेनेच्या उमेदवार अर्चना उमेश दुतोंडे यांनी 434 मतांनी बाजी मारली. तर भाजपच्या रुपाली बनसोडे यांना 290 मतं मिळाली असून त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
महत्वाच्या घडामोडी –
“पडळकरांनी अजित दादांवर केेलेले आरोप म्हणजे, स्वत:ची किंमत वाढवण्यासाठी केलेला भाबडा प्रयत्न”
भाजपला लाज वाटली पाहिजे, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची मागणी
शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर? फडणवीसांची घेतली भेट