Home महाराष्ट्र “महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलंय”

“महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलंय”

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार, असं ठरलं असल्याचं अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलंय. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन कामं करावी असा प्रयत्न आहे.तसेच एकत्र लढण्याची आमची भूमिका असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ते स्पष्ट केलंय. तर काही लोकांचं वैयक्तिक मत वेगळं असू शकतं, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसची याबाबत अजूनही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. महाविकास आघाडीने मुंबई महापालिका निवडणुकीबाबतचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरवलेला नाहीये. आणि याबाबत कोणतीही बैठक झालेली नाही, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत”

“होय, मी मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे”

अनेकजण डोळे लावून बसले होते, पण…; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच- छगन भुजबळ