Home महाराष्ट्र “महाविकास आघाडी घाबरली, नवी मुंबईत महापाैर भाजपचाच होणार”

“महाविकास आघाडी घाबरली, नवी मुंबईत महापाैर भाजपचाच होणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याचं आज झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील नेत्यांनी सांगितलं आहे. यावरून भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी प्रतिक्रिया देत आघाडी सरकारवर निशाणा साधला.

हे ही वाचा : “मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रूपाली पाटील यांनी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना केलं अभिवादन”

इतके दिवस स्वबळावर निवडणुका लढणार असे सांगणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष भाजपला घाबरले असल्याचं रामचंद्र घरत यांनी म्हटलं. तसेच या नवी मुंबईचा विकास फक्त भाजपच करू शकतं आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येणार असून, महापौर भाजपचाच असेल, असं रामचंद्र घरत म्हणाले.

दरम्यान, येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण कसं लढायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. त्यांचे कार्यकर्ते रोज आमच्याकडे येत आहेत. नाना पटोले स्वबळावर लढणार म्हणत होते. आता आघाडीच्या चर्चा सुरु आहेत. भाजपनं चार दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचं पानिपत केल्याचं आपण पाहिलं आहे. मंदा म्हात्रे आणि मी लढत होतो. मात्र, आता गणेश नाईक सोबत आल्यानं भाजपची ताकद वाढलीय. भाजपचा महापौर नवी मुंबई महापालिकेमध्ये पाहायला मिळेल, असं रामचंद्र घरत यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे; महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

“ठाकरे सरकारच्या बुध्दीहिन भूमिकेने ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला”

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही; चंद्रकांत पाटलांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य