Home महाराष्ट्र “11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारलाय, लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला”

“11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारलाय, लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारनेही या घटनेचा निषेध म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लाज वाटली पाहिजे या पक्षांना, जनता कोरोना व आर्थिक संकटामुळे अडचणीत आहे, व्यापारी व उद्योगधंदे पूर्णपणे विस्कटले आहेत, राज्यात बेरोजगारी वाढली, त्यात UP मध्ये जे घडलं ते खरं की खोटं हे सुद्धा माहीत नाही, मग हा बंद कशासाठी? असा सवाल निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

लखीमपूर हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी- जयंत पाटील

“मनसेची मोठी खेळी; राष्ट्रवादीत गेलेल्या ‘या’ नेत्याचा पुन्हा मनसेत प्रवेश”

निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाकडून छापे; अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“तुम्ही शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, आता शेतकरी तुमच्या पक्षावर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही”