मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. आणि हे सरकार शरद पवारांच्या इच्छेनेच पडेल, असा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील सत्ता भाजपच्या हातून हिसकावून घेतल्यामुळे भाजपचे नेते ताळतंत्र सोडून वाटेल तसे बरळत सुटले आहेत. अकारण बरळण्याची आणि वाचाळपणाची भाजप नेत्यांची सवय जुनीच आहे. आकाशपाताळ एक करुन पंतप्रधानसह सर्व नेत्यांच्या सभांचे आयोजन करुनही केवळ 105 वर भाजपची गाडी अडकली. सध्या भाजपच्या एकाही नेत्याला कुणीही गांभीर्याने घेत नाही. कहर म्हणजे सरकार पडण्याच्या तारखा देण्याला सुरूवात केली, असं म्हणत अनिल गोटे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, शरद पवारांनी स्थापन केलेले सरकार त्यांच्या इच्छेनेच पडेल. सत्तेचा गोवर्धन तसूभर हलणार नाही. भाजपचे वाचाळ महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची एक विटही हालवु शकले नाही. उलटपक्षी अकारण रोज उठून शासनावर टीका करायची, असंही अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…मग कळेल रस्त्यावर कोण; नारायण राणेंवर केलेल्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्यृत्तर
फडणवीसांनी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं- नितीन राऊत
भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण
“नारायण राणेंच शिवसेनेशी जुनं नातं, ते सेनेमुळेच मोठे झालेआणि सेने मुळेच रस्त्यावरही आले”