Home महाराष्ट्र अर्णब गोस्वामींच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार- नारायण राणे

अर्णब गोस्वामींच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार- नारायण राणे

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

अर्णव गोस्वामी यांना आज अलिबागहून तळोजा कारागृहात हलवण्यात आलं आहे. त्यावेळी आपल्याला पोलिसांनी वारंवार मारहाण केल्याचा आरोप अर्णव गोस्वामी यांनी केला आहे. यावरुन नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

अर्णव गोस्वामी यांचे प्रकरण उच्च न्यायालयात असूनही वारंवार वेगवेगळ्या तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ राज्य सरकार आणि पोलिसांना चालवला आहे. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदार महाविकास आघाडी सरकारची राहिल, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल- रोहित पवार

रामदास आठवले कोरोनामुक्त; शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

महाराष्टातील धामिक स्थळे दिवाळीनंतर सुरू करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे