आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचं विधीमंडळांच हिवाळी अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनात गोंधळ जास्त बघायला मिळत आहे. अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आणि सरकारमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे, अशातच सदाभाऊ खोत यांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
विधान परिषदेमध्ये चर्चा होत असताना, दोन वर्षाच्या काळात एक तरी योजना जनहिताची राबवली हे दाखवून द्यावे, एकच योजना यांनी राबवली ती म्हणजे वाझे वसुली योजना, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार ठाकरे-अंकिता पाटील अडकले विवाहबंधनात”
आता एक नवीन योजना सुरू आहे गावोगावी, मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. मी मटका, गुटखा या चिठ्या सभागृहात दाखवल्या आहे. सरकारचे यावर लक्ष नाही आणि सरकार म्हणते कुठे गुटखा, मटका नाही, असा आरोपही सदाभाऊ खोतांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे सरकार पळपुटं सरकार, हे आज सिद्ध झालंय; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
महाविकास आघाडी सरकारमधील ‘इतके’ आमदार नाराज; बावनकुळेंनी केला खुलासा