आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार सर्व सामान्यांचं राहिलेलं नाही. हे सरकार काम करताना दिसत नाहीये. हे सरकारच हरवलं आहे. शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
मी मुख्यमंत्री असताना धनाचा बोनस देण्याची सुरूवात केली होती. आमच्या सरकारच्या काळात आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घोषणा करायचो. पण या महाविकास आघाडी सरकारने हा बोनसच बंद केला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हे ही वाचा : अमित शहांच्या मदतीसाठी अजित पवार धावून आले, यावर रूपाली पाटील यांची प्रतिक्रिया म्हणाल्या…
आमच्या सरकारच्या काळात आम्ही एकाही शेतकऱ्याची वीज कापली नाही. मात्र या सरकारच्या काळात दररोज वीज कापली जात आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण रद्द करण्याचं पाप केलं आहे. यांना मराठा आरक्षण देखील देता आलं नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्याने आता ओबीसींचं राजकीय प्रतिनिधीत्व आता धोक्यात आलंय, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, लाखणीमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्यावर सभेमध्ये देवेंद्र बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा; पंकजा मुंडेंनी उधळली स्तुतीसुमने
अखेर ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मागितली माफी, म्हणाले…
“मनसेचा कर्नाटक सरकारला थेट कानडीतून इशारा”