आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आपली कंबर जोरदार कसली असून राज ठाकरे स्वत: सक्रीय झाले असून पक्षवाढीसाठी जोरदार तयारी सूरू झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे आणि भाजप यांच्यात युती होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सूरू झाल्या होत्या. यावरून आता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा”
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या पुणे, नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी मनसेच्या युतीबाबत मोठं भाष्य केलं आहे.
युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. निर्णय घेतल्यावर आम्ही तुम्हाला कळवू, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी मनसेला आलेल्या प्रस्तावावर देखील भाष्य केलं आहे. सध्या युतीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रस्ताव आला आहे, पण कोणासोबत जायचं याचा निर्णय अद्याप घेतला नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…म्हणून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं”; म्हणाले, ‘स्वत:ला राज ठाकरे समजू नका’
रोहित आणि हार्दिक यांच्यासोबत धनंजय मुंडेंचीही तुफान बॅटिंग, म्हणाले…