“महाराष्ट्राचा इतिहास दबावाखाली बाजू बदलणाऱ्या, खंडोजी खोपडेंचा नाही तर…; “

0
377

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंड करत 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात झाली. यावेळी बोलताना, अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

महाराष्ट्राचा इतिहास दबावाखाली बाजू बदलणाऱ्या खंडोजी खोपडेंचा नाही. तर, वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी राजे देशमुख यांचा आहे, असं विधान अमोल कोल्हे यांनी यावेळी केलं.

ही बातमी पण वाचा : भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवकांसह पाचशे कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल

वारंवार पक्ष आणि आमदार का फोडले जात आहेत, याचा विचार केला पाहिजे. केंद्रातील सरकार सत्तेत येऊन 9 वर्ष झाली आहेत. ‘मोदी @ ९’ कार्यक्रम टिफिन बैठका सुरु आहेत. पण, 9 वर्षात महागाई कमी झाली नाही. दरवर्षी 2 कोटी प्रमाणे 18 कोटी रोजगार मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव मिळाला नाही, याची केंद्रात बसलेल्या सरकारला जाणीव आहे., असंही अमोल कोल्हे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! शिंदे गटाचे ‘ते’ आमदार अपात्र ठरणार?; विधानसभा अध्यक्ष नोटीस बजावणार”

 तुमची असेल-नसेल ती, सगळी ताकद लावा अन्…; येवल्यातील जाहीर सभेतून शरद पवारांचं, पंतप्रधान मोदींना जाहीर आवाहन

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक ट्विट; म्हणाल्या, तुफानाला तोंड द्यायला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here