आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली असून, ठाकरे गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांची विधानसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यावरुन आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि शिंदेगट यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी मुंबईला रवाना
“अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढं पुढं पहा. आणखी बरंच पोळायचं आणि भाजायचं बाकी आहे. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील”,“याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील! पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
मशालीच्या अग्निप्रकाशात भविष्यातील शिवसेनेचे तमाम विजयमार्ग आम्हाला स्पष्ट दिसत आहेत!, भाजपचं माघारी नाटय़ हे दिसतं तसं सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आलं असावं आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही ‘भडकलेली मशाल’ बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो, असा हल्लाबोल सामनामधून केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
पोटनिवडणुकीतून मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा
“रायगडमध्येही मनसेचा भगवा झेंडा फडकला; सरपंच पदासह 7 जागा जिंकत ग्रामपंचायतीवर मिळवलं वर्चस्व”