मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन निष्ठेने सांभाळला.विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे., असं जयंत पाटलांनी म्हटलं.
आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला. गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली., असं म्हणत जयंत पाटील यांनी गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला. गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मोठी बातमी! पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली करु नका; ऊर्जामंत्र्यांचे आदेश
गप्पा पुरोगामीपणाचा आणि काम अंधश्रध्दा वाढविण्याचं; केशव उपाध्येंची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच निधन