ठाणे : महाराष्ट्र हे देशातील ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सीजन बाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे, महाराष्ट्र हे देशातील ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
दरम्यान, मीरा भाईंदर येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या संभाव्य लाटेत राज्य ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. महाराष्ट्र हे देशातील ऑक्सीजन बाबत स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मीरा भाईंदर येथील ऑक्सिजन प्रकल्पाच्या लोकार्पणावेळी व्यक्त केला
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 10, 2021
महत्वाच्या घडामोडी –
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
“प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन”
“IPL 21 च्या उर्वरित सामन्यांच्या नियमांमध्ये बदल, BCCI कडून नवी नियमावली जारी”
नीरज हा मराठाच, मी स्वत: त्याच्या घरी जाऊन आलोय- संभाजीराजे छत्रपती