Home महाराष्ट्र महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक :  राज्यात कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय तसेच विविध उद्‌घाटनांच्या कार्यक्रमांसाठी पाटील नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी ‘सकाळ’च्या एमआयडीसी कार्यालयाला भेट दिली.यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांना जनता कंटाळली आहे. या सरकारकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. तसेच दुसरीकडे राज्यातील कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात ढासाळली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी आणीबाणी लागू होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : नक्षलवाद्यांनो हिंसेचा मार्ग सोडा नाहीतर तुमचा बिमोड करणारच; एकनाथ शिंदे

दरम्यान, राज्यात 2014 ते 2019 या कालावधीत एकही दंगल घडली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबरोबरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. त्या काळात राज्यात क्राईमचा रेट कमी होता. अधिकाधिक केसेस नोंदविण्याचे फर्मान त्यांनी काढल्याने कायद्याचा धाक वाढला होता. आता कायद्याचा धाक राज्यात संपला आहे. दंगली घडत आहेत. हे पाहता नागरिकांध्ये भीतीचे वातवरण आहे. गुन्हेगार जामीनावर बाहेर फिरत आहेत. सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपचा शिवसेनेला मोठा दणका; शिवसेनेचे ‘हे’ बडे नेते भाजपात

महाविकास आघाडी सरकार हे राक्षशी प्रवृत्तीचे; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

“उद्धव ठाकरे राज्यातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही प्रगती करतील”