मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी होत चालल्याने हळूहळू हा लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. तसंच नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लॉकडाऊन दरम्यान राज्यात लावलेले निर्बंध टप्प्याटप्याने शिथिल करण्यात येत आहेत. शिवाय या महिन्याच्या अखेरीस राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणली जाईल आणि डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल., असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार- वर्षा गायकवाड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल- प्रविण दरेकर