मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
आजची भेट सदिच्छा भेट होती. भाजप-मनसे युतीबाबत कुठलाही प्रस्ताव नव्हता. अशा गोष्टी घडण्यासाठी योग्य वेळेची गरज असते. मात्र राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेते व्हावे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आणि भाजपची आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबद्दल आपली भूमिका व्यापक करावी, ही अपेक्षा व्यक्त केली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची नाशिकमध्ये भेट झाली होती. त्यांनी भेटीचे निमंत्रण दिल्याने आज सदीच्छा भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती असे मी म्हणणार नाही. पण युतीची चर्चा नाही तर एकमेकांच्या भूमिकेांविषयी चर्चा झाली, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
दरम्यान, त्यांच्या परप्रातीयांद्दलच्या काही भूमिका मला समजून घ्यायच्या होत्या. कुठल्याही माणसाच्या दोन भूमिका असतात, एक माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून.. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती. त्यासाठी आजची भेट झाली. राज ठाकरे माझ्या घरी चहासाठी आले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस असेल, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राजीनामा द्या, अशी जनतेची मागणी”; ‘खेलरत्न’च्या नामांतरावरुन रुपाली चाकणकरांचा टोला
मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर…; चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना आव्हान
लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार; कांदिवलीत भातखळकरांचं रेलभरो आंदोलन
“माझ्या मनातील प्रश्न मी राज ठाकरेंसमोर मांडले, युतीचा कोणताही प्रस्ताव भेटीत मांडला नाही”