Home महाराष्ट्र “मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या लोकल रेल्वेच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे”

“मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या लोकल रेल्वेच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे, असं मनसेनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये”

“मोदी-जेटलींचं नाव क्रिकेट स्टेडियमला दिलं गेलंय, त्यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली होती?”

घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले; केशव उपाध्येंची ठाकरे सरकारवर टीका

कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे