मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाउनचा कालावधी 14 एप्रिल रोजी संपणार आहे. पण महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील करोनाबाधितांची संख्या 15 एप्रिलपर्यंत कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. मात्र सध्या हा आकडा वाढत आहे. आपल्याला लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे, असं रोजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं; अजित पवारांच जनतेला आवाहन
तेढ निर्माण करणारे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवू नका, नाहीतर…
अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे; मरकजमधल्या प्रकारावर राज ठाकरे संतापले
…तर राज्य व देश अंधारात जाण्याची भिती; उर्जामंत्र्यांचा इशारा