महाराष्ट्रात लोकशाही नसून ‘लॉकशाही’ आहे; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

0
137

पंढरपूर :  कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच उठसूठ लॉकडाऊन केला जात आहे, असं म्हणत महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दुर्देवाने ही पोटनिवडणूक लागली आहे. एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे, असं म्हणत  देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे. परंतु, ही परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच लॉकडाऊन केला जात आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे. राज्यात लोकशाही नसून लॉकशाही आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंल आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“जयंत पाटलांनी पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी”

…तर संघर्ष अटळ आहे; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा

बेअरस्टो, पांडेचे झुंजार अर्धशतकी खेळी व्यर्थ ; कोलकाताचा हैदराबादवर 10 धावांनी विजय

“शरद पवारांच्या सभेची पुनरावृत्ती, फक्त यावेळी पावसात भिजले जयंत पाटील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here