अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यातील लसीकरणाला वेग आला आहे. राज्यात सोमवारी 5 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं होतं. या लसीकरणाने विक्रमी नोंद केली होती. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
संपूर्ण देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केले. आता 1 मे पासून 18 ते 45 हा वयोगट सुद्धा पात्र झाला. कोविशील्डच्या मे अखेरपर्यंत 10 कोटी, कोवॅक्सिनच्या 3 कोटी,तर ऑगस्टपर्यंत 6 कोटी लसी येत आहेत., असं देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
संपूर्ण देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केले. आता 1 मे पासून 18 ते 45 हा वयोगट सुद्धा पात्र झाला.
कोविशील्डच्या मे अखेरपर्यंत 10 कोटी, कोवॅक्सिनच्या 3 कोटी,तर ऑगस्टपर्यंत 6 कोटी लसी येत आहेत.https://t.co/4vGwdErhYf#COVID19India— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 29, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचं सोंग पाकिस्ताननं का करावं?”
तू कोट्यवधींची मालकीण आहेस तर देशसेवेसाठी खर्च कर; राखी सावंतचा कंगणाला सल्ला
क्विंटन डी कॉकची दमदार खेळी; मुंबईचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय
माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात; एम्स रूग्णालयातून दिला डिस्चार्ज