महाराष्ट्र आणि शिवसेना कुणासमोर झुकणार नाही- संजय राऊत

0
301

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेची आज सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा झाली. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय.

आपल्या तोफा नेहमी धडाडत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  खूप मोठा दारुगोळा घेऊन स्टेजवर येणार आहेत. खऱ्या तोफा काय आहेत हे महाराष्ट्राला आज समजणार आहे. वांद्र्यात सुरु झालेल्या सभेचं टोक कुर्ल्यात आहे. आजची सभा 100 सभांची बाप आहे. आजची सभा सांगते मुंबईचा बाप शिवसेना  आहे. कुणाला आजमवायचं असेल तर येऊन पाहा, असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला, राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…

आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हे आहेत. आजची सभा सांगते महाराष्ट्र आणि शिवसेना कुणासमोर झुकणार नाही. लोकं म्हणतात संघर्षा के आगे जित आहे. हा उसळलेला हिंदू महासागरानं महाआरती सुरु केली आहे. महासागरानं महाआराती केली तर लडाखमध्ये घुसलेलं सैन्य पळून जाईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर आज तुम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत; छगन भुजबळ संतापले

खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, त्यामुळे…; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here