‘या’ कारणासाठी महादेव जानकर करणार दिल्लीत आंदोलन; पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती

0
267

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षातर्फे  महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली येथील जंतर- मंतर मैदानावर संपूर्ण देश पातळीवरील ओबीसी समाज एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी ही माहिती दिली असून खालील विषयावर बालाजी पवार यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. तसेचं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

हे ही वाचा : शरद पवारांनी शिवसेना संपवली; बंडखोर आमदारांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

1) जातनिहाय जनगणना करणे

2) ओबीसी आरक्ष्षण कायम करणे

3) नॉन क्रिमीलिअरची अट रद्द करणे

4) 50 टक्के सिलींग हटविणे

5) सार्वजनिक संस्थामध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे

6) न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये संपू्र्ण आरक्ष्षण लागू करणे

7) शेती, धान्य मालाला हमीभावाने खरेदीची हमी देणे

8) महागाई थांबविण्यासाठी ठोस पाऊल उचलणे

9) संपुर्ण शिक्षण मोफत करणे

10) मोफत अरोग्य सुविधा पुरविणे

वरील मागण्या शासनाने मान्य कराव्या,  अशी विनंती पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केली.

दरम्यान, या पत्रकार परिषदेला बालाजी दादा पवार (शहर अध्यक्ष ), पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सचिन गुरव, कविता जावळे (ज़िल्हा अध्यक्ष महिला ), प्रसाद कोळेकर, राजेश लवटे (सचिव ), वैजनाथ स्वामी (संपर्क प्रमुख ), नारायण यमगर (संघटक ), बिरुदेव अनुसे (मीडिया प्रमुख ), तुषार तामखेडे (वॉर्ड अध्यक्ष ) उपस्थिती होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज्यस्तरिय अबॅकस स्पर्धेमध्ये सांगलीने मारली बाजी

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बंडखोरीआधी नेमकं काय घडलं?; उद्धव ठाकरेंनी केला खुलासा, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here