आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाने शिविगाळ केल्याचा आरोप रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशन येथे पवार यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणाची महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी, पोलिसांनी शिविगाळ केलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचा हेतू काय आहे, का शिविगाळ केली, याचा तपास करावा, अशी मागणी शहराध्यक्ष पवार यांनी केली आहे.
ही बातमी पण वाचा : मनोरंजन विश्वावर शोकाकुळ! ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन
रात्री 11 वाजता बालाजी पवार हे पुण्यातील बालाजीनगर परिसरातून जात होते, त्यांच्या गाडीवर महादेव जानकर यांचा फोटो आहे. हा फोटो पाहून एका व्यक्तीने जानकर यांच्या नावाने शिविगाळ केली. तसेच त्याने बघून घेण्याची धमकीही दिली. आणि त्या व्यक्तीने तेथून पळ काढला, असा आरोप बालाजी पवार यांनी केला आहे.
दरम्यान, महादेव जानकर यांना महाराष्ट्र सरकारने सुरक्षा द्यावी, अशी मागणीही बालाजी पवार यांनी सरकारकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता…; राज ठाकरे संतापले
“महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही”