“महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं निधन”

0
286

रायगड : महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं निधन झालं. ते 54 वर्षांचे होते.

मुंबईत रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हॅंडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त धक्कादायक असून कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान व उमदे नेतृत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत., असं महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.

महत्वाच्या घडामोडी –

पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत; राज्य सरकारची मोठी घोषणा

कृष्णेचं पाणी उद्या सकाळी 52 तर सायंकाळी 47 फूट होईल; पाटबंधारे उपअभियंता लालासाहेब मोरेंनी दिली माहिती

सीएम बीएम गेला उडत, आम्हाला नावं नका सांगू कुणाची?; नारायण राणेंनी जिल्हाधिकाऱ्यावर व्यक्त केला संताप

कृष्णेची पातळी कमी होत आहे, कुणीही घाबरून जाऊ नये, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here