आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना लखनाै सुपर जायंट्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनाैने, हैदराबादचा 5 विकेट्सने पराभव केला.
हैदराबादचा कर्णधार एडन मार्क्रमने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात 8 विकेट गमावत केवळ 121 धावाच केल्या. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 41 तेंडूत 35 धावांची खेळी केली. तर अनमोलप्रित सिंगने 26 चेंडूत 31 धावा केल्या. तर अब्दुल समदने 10 चेंडूत 21 धावांची वेगवान खेळी केली. तर लखनाैकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक 3, तर अमित मिश्राने 2, तर यश ठाकूर व रवी बिश्नोईने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
ही बातमी पण वाचा : वरळीतून पराभवाची जाणीव झाल्यामुळे, आदित्य ठाकरेंनी ठाण्याला….; मनसेचा टोला
दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना लखनाैने हे लक्ष्य सहज पार केलं. लखनाैनं हे लक्ष्य 16 व्या षटकात 5 विकेट गमावत पूर्ण केलं. लखनाैकडून कर्णधार के.एल. राहूलने 31 चेंडूत 35 धावा केल्या. तर कृणाल पांड्याने 23 चेंडूत 34 धावांची खेळी केली. तर हैदराबादकडून आदिल रशीदने 2, तर भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूखी व उमरान मलिकने प्रत्येकी 1 विेकेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी
मोठी बातमी! काँग्रेसने ‘या’ बड्या नेत्यावर केली थेट निलंबनाची कारवाई
पुणे पोटनिवडनुकीसाठी महाविकास आघाडीकडून ‘या’ तीन नावांची जोरदार चर्चा
“देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे, ठाकरेंनी माफी मागितल्यास ते माफ करतील”