‘बघा हे महाराज विनामास्क बसलेत’, बारामतीत अजित पवारांनी अधिकाऱ्याला खडसावलं

0
300

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना नियमांचं अत्यंत गांभीर्यानं पालन करतात. अजितदादा कोरोनाबाबत किती जागृत आहेत हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. अजितदादा बारामती दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा त्याचं प्रत्यंतर आलं.

अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील कटफळमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी एका अधिकाऱ्यानं मास्क घातला नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. कार्यक्रम सुरु असतानाच अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्याला चांगलंच खडसावलं.

दरम्यान, या कार्यक्रमात मी मुद्दाम सगळ्यांकडे पाहत होतो. तर हे महाराज विनामास्क बसलेत. बाबांनो स्वत:ची काळजी घ्या. मास्क नियमीत वापरा. तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने कोरोना पुन्हा डोकाऊ पाहतोय. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घ्या, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

‘राज्यपाल शेवटी पॉलिटिकल एजंट असतात’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

राज्यातील भाजप नेत्यांनी तरी तारतम्य पाळायला हवं होतं; शरद पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली, पाप केलं की कोरोना होतो; संजय राऊतांचा टोला

12 सदस्यांमध्ये राजू शेट्टींचं नाव, त्यांच्याबाबतचा निर्णय राज्यपाल घेतील- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here