पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 13 जुलै ते 23 जुलैदरम्यान असेल. पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी काल (12 जुलै) पदभार स्वीकारल्यानंतर संध्याकाळी लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली.
सर्व किराणा दुकाने 14 ते 18 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत. 13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. पेट्रोल पंप आणि गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील. याशिवाय दहा दिवस हॉटेल्स आणि लाॅजदेखील बंद राहणार आहेत.
दरम्यान, सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाॅज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत.
पुण्यामध्ये 13 जुलै ते 23 जुलै काय सुरू काय बंद
- पुण्यात दहा दिवस सर्व सलून दुकानं, स्पॉ, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील.
- 14 ते 18 जुलै या पाच दिवसात भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी बाजार, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील.
- तर 19 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु राहतील.
- मटन, चिकन, अंडी यांची विक्री 14 ते 18 जुलै या पाच दिवसात पूर्णपणे बंद राहील.
- त्यानंतर पुढचे पाच दिवस सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मटन, चिकन, अंडी यांची विक्री सुरु राहील.
- पुण्यात 13 ते 23 जुलै या दहा दिवसात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद राहतील.
पुणे शहरातील लॉकडाऊनची सविस्तर नियमावली !#PuneFightsCorona
(१/३) pic.twitter.com/zL9ut0CSth
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांच प्रत्यृत्तर; म्हणाले…
“महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री; फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होईना”
“हा घ्या; संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा पुरावा’”
चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी; अन्यथा…; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना इशारा