पुणे : पुण्यामध्ये आज पत्रकार परिषद पार पाडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा नसताना पुण्यातील लॉकडाऊन का हटवण्यात आला? असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना केला. त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पुण्यातील लॉकडाऊन हे व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवावा लागला असा खुलासा अजित पवारांनी केला आहे. आम्ही स्वतः म्हणतोय लॉकडाऊन उठवा, मग तुम्ही का उठवत नाही, अशी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून मागणी होत होती. हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली तेव्हा भाजीपाला मिळत नाही, अशी ओरड सुरु झाली. त्यावेळी ही आमच्यावर दबाव आला, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशा प्रकारे अजित पवार यांनी लॉकडाऊन उठवण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘ही’ नवीन मोहिम राबवणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कंगना रणौतसोबत माझं काही व्यक्तीगत भांडण नाही, पण…-संजय राऊत
अखेर कंगणा रणाैतचा सूर बदलला; म्हणाली, जय मुंबई, जय महाराष्ट्र