पुणे : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. आकडेवारीनुसार शिथिलता मिळाल्यानंतर पुण्यातील मार्केटमध्ये, गडांवर, मॉल, दुकानांमध्ये प्रचंड गर्दी होत होती. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लाॅकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार ! पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल., असं मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार !
पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर…; शिवसेनेचा इशारा
भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन
शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम, परिणाम भोगावे लागतील- चंद्रकांत पाटील
“भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही, उद्याही घाबरणार नाही”