Home महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार; सरकारचा मोठा निर्णय

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार; सरकारचा मोठा निर्णय

औरंगाबाद : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबचा निर्णय घेतला आहे. नुकतंच पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

जाहीर केलेल्या निर्णया नुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील, तर शासनामार्फत संबंधीत सावकारास ती रक्कम अदा करण्यात येईल.

mortgage loan waiver, मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचं सावकारी कर्जही माफ, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास देण्यात येईल. अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही या शासन निर्णयात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त 1 करोड जाहीर करताना लाज वाटली नाही का?”

“चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी”

महाभारतातला दुर्योधन रामाला भेटायला चालला- निलेश राणे

यांना घाबरट सेना म्हणावे का?; आशिष शेलारांचं शिवसेनेवर टिकास्त्र