Home महाराष्ट्र “चिक्की प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडणं म्हणजे, शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम”

“चिक्की प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडणं म्हणजे, शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम”

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडेंना अडचणीत आणणारा चिक्की घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात अजून एफआयआर दाखल झाला नाही. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे याबाबत गुरुवारी पुन्हा विचारणा केली. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने चिक्की प्रकरणात कंत्राटदारावर एफआयआर का दाखल केला नाही, अशी विचारणा केली आहे. परंतु त्याचा पंकजा मुंडे यांच्याशी काहीएक संबंध नसून या प्रकरणाविषयीचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभेत दिले होते. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कृत्याचा आरोप थेट मंत्र्यावर करणे योग्य नाही. शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप दरेकर यांनी यावेळी केला.

दरम्यान, एखाद्या गोष्टीत मंत्र्याचा थेट हस्तक्षेप होऊन जर घोटाळा झाला असेल, तर आरोप करता येतात. पण प्रशासकीय कंत्राटदाराकडून गैरव्यवहार झाले असतील तर त्याला ते जबाबदार असतात. त्यामुळे मंत्र्याची चूक नसताना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नसल्याचं देखील दरेकरांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“अभिनेत्री राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड फोटो सोशल मिडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…;

दादर, माहीमच काय नितेश राणेंना कोकणातही जिंकू देणार नाही; शिवसेनेचा इशारा

“माझा राजकीय प्रवास संपविण्याचा प्रयत्न; महिलेच्या आरोपांवर संजय राठोड यांचं स्पष्टीकरण”

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती तोडावी, अन्यथा…- रामदास आठवले