सुशांत सिंग राजपूतने ज्या पद्धतीने स्वत:च्या घरात फॅनला लटकून स्वत:ला संपवलं, अगदी त्याच पद्धतीने आणखी एका अभिनेत्रीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.
बिग बाॅसमुळे प्रसिद्धीच्या प्रकाश झोकात आलेली अभिनेक्षी जयश्री रामय्या हिने गेल्या वर्षी जून महिन्यात सोशल मिडियावर आपण आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अनेक जण तिच्यापर्यंत पोहोचले. कानडी सुपरस्टारने तिला काम मिळवून देऊन मदत करण्याचंही सांगितलं. त्यानंतर ती कशीबशी नैराश्यातून बाहेर पडली.
कन्नड Big Boss च्या तिसऱ्या सीझनमध्ये जयश्री रामय्या सहभागी झाली होती. तिच्यानंतर अनेक स्पर्धकांना रिअॅलिटी शोनंतर कुठे ना कुठे काम मिळालं. पण जयश्री त्याबाबतीत खूश नव्हती. तिला अभिनयाच्या क्षेत्रात योग्य संधी मिळाली नाही आणि त्यातूनच तिला नैराश्य आलं.
महत्वाच्या घडामोडी-
“कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का?”; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापले
“मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये”
नशिबाने उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे हे अजित पवारांनी विसरू नये- निलेश राणे