आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. काल 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
ईद (3 मे) नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाही तर 4 मे पासून बिना परवानगीचे भोंगे असलेल्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा पठण झालेच पाहिजे, अशी राज यांनी या सभेत घोषणा केली. तसेच राज यांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
शरद पवार यांनी जातीय व्देष निर्माण केला. त्यांनी निर्माण केलेली जातीयवादाची तेढ आता महाविद्यालयाच्या स्तरावरही पोहचली आहे. आपण जात- पात मानत नाही. पण राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जन्मानंतरच जातीय तेढ व द्वेष वाढल्याच्या आरोपही राज यांनी यावेळी केला. यावरून राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : “राजकीय घडामोडींना वेग, ‘या’ निवडणूकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी”
राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत राज यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
जसे शेन वॉर्नला स्वप्नांत सचिन तेंडुलकर दिसायचा तसं राज ठाकरे यांचं झालं असून त्यांना स्वप्नांत तर दिसतातचं पण जळी-स्थळी,काष्ठीसुद्धा खा.शरद पवार साहेब दिसत आहेत., असा टोला वरपे यांनी राज यांना लगावला.
जसे शेन वॉर्नला स्वप्नांत सचिन तेंडुलकर दिसायचा तसं राज ठाकरे यांचं झालं असून त्यांना स्वप्नांत तर दिसतातचं पण जळी-स्थळी,काष्ठीसुद्धा खा.शरद पवार साहेब दिसत आहेत.@NCPspeaks @abpmajhatv @News18lokmat @SarkarnamaNews @thodkyaat @3kmIndia #ravikantvarpe pic.twitter.com/FpHFIdVZCn
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) May 1, 2022
महत्वाच्या घडामोडी –
3 मे नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाहीत तर…; औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंची मोठी घोषणा
कुणी कितीही भगव्या शाली पांघरल्या, तरी…; संजय राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण!