देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे अजेंडा आणि व्हिजन नाही- चंद्रकांत पाटील

0
664

मुंबई : देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे अजेंडा आणि व्हिजन नाही, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांचा काही अभ्यास आणि अजेंडा नाही. मला मुख्यमंत्र्यांनी रजिस्ट्रर सावकारी आणि सावकारी यामधील फरक सांगावा. हे जेव्हा तुम्हाला माहिती नसतं तेव्हा डोक्यात सावकारी संपवायची आहे याबद्दल अजेंडाच निर्माण होऊ शकत नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी जन्माला आले नाहीत. ते परंपरागत वारसा घेउन चालनारे नेते आहेत. त्यांचा जो वारसा आहे तो यशस्वीपणाने चालवतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांचं व्यक्तिमत्व कमाल असून मला त्यांच्यावर पीएचडी करण्याची इच्छा आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी-

अजित पवारांवर पीएचडी करण्याची माझी इच्छा आहे- चंद्रकांत पाटील

राज्य सरकारच्या आदेशाचा चंद्रकांत पाटलांना विसर

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here