नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी देशाविसायांना संबोधित करताना 5 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचं आवाहन केलं आहे यावर मोदींनी केलेले आवाहन घातक असून, त्यामुळे वीजनिर्मिती बंद पडू शकते ‘ असा दावा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.
एकाच वेळी सगळ्यांनी दिवे व पंखे बंद केले तर ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होऊ देशातील सर्व वीजनिर्मिती केंद्रे बंद पडतील. मोठे नुकसान होऊ शकेल. पुन्हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक तास लागतील. लोकांनी या आवाहनास प्रतिसाद देऊ नये, असं नितीन राऊत म्हणाले.
करोनासारख्या प्रादुर्भावाशी लढताना ते वैज्ञानिक भूमिका घेत नसून दिवे लावण्याचे आवाहन करीत आहेत, हे अयोग्य आहे. पंतप्रधान देशाला ‘एप्रिल फूल’ बनवित आहेत. कुणीही दिवे बंद करू नये, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास 50 लाखांची मदत”
मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर- रुपाली चाकणकर
सांगली पोलिसांची कारवाई; आदेशाचं उल्लंघन करत सामूहिक नमाज पठण, 36 जण ताब्यात