शिवसैनिकांची पत्रं ‘प्रहार’मधून छापतो, मग बघू कशी कुरकुर होते; नितेश राणेंचा राऊतांना निशाणा

0
152

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ संपादकीयमधून नितेश राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्या टीकेला उत्तर देत नितेश राणेंनीही सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

‘सामना’चं आमच्यावर प्रेम आहे. असणारच का नाही असणार शेवटी ओल्ड इज गोल्ड. पण काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायच पण नाही. काही पत्र आहेत माझ्या कडे. तळकोकणच्या प्रहार मधुन लवकरच छापतो. मग बघु कशी कुरकुर होते, असं ट्विट करत नितेश राणेंनी आपल्याकडील पत्रं ‘प्रहार’मधून छापण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले, अशी टीका नितेश राणें यांच्यावर ‘सामना’मधून करण्यात आली आहे. या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर देत संजय राऊतांना इशारा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

लातों के माफिया बातों से नाही मानते; सोनू निगमचा ‘या’ संगीतकारांना इशारा

“अमित ठाकरे राजभवनात; निवासी डॉक्टरांच्या परीक्षांबाबत राज्यपालांशी चर्चा”

आशा सेविकांसाठी अमित ठाकरेंची अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

“यंदाचा गणेश उत्सव कोविड-19 च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करु”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here