Home महाराष्ट्र “…तर खांद्याला खांदा लावून काम करु”; नितेश राणेंचं मोठं वक्तव्य

“…तर खांद्याला खांदा लावून काम करु”; नितेश राणेंचं मोठं वक्तव्य

सिंधुदूर्ग : शिवसेना आणि राणे कुटुंब यांच्यातील नातं काही लपून राहिलेलं नाही. राणे पिता-पुत्रांकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जातं. भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सिंधुदूर्ग जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र काम करण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षनेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु,” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. सिंधुदूर्गमध्ये सागररत्न बाजपारपेठेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरु होती, ती नंतर बंद झाली. पण आता भाजपा आणि शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल”, असा टोलाही नितेश राणे यांनी यावेळी लगावलाय.

दरम्यान, या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते दीपर केसरकर, विनायक राऊत उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही खांद्याला खांदा लावून काम करुन असं म्हणत अप्रत्यक्षपणे युतीला पाठिंबा दर्शवला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आम्ही त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही; नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

“नाना पटोले स्वत:ला मुख्यमंत्री समजू लागले होते, पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाच करून टाकला”

आमचं ठरलंय! विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय- राज ठाकरे