मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसलं आहे. ग्रामीण भागातही कोव्हीड रुग्णांची वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारीविरुद्ध लढा देऊ, असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे.
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 1100 रुग्ण बरे झाले आहेत. आजही 400 रुग्ण उपचार घेत आहेत. असे असतानाही आजपर्यंत सहा महिन्यामध्ये सरकारकडून त्यांना फक्त 44,000 रुपये मिळाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांकडून सहकार्याची अपेक्षा तरी कशी ठेवायची, असा सवालही चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
https://www.facebook.com/ChDadaPatil/posts/2655754068075118
महत्वाच्या घडामोडी-
“…तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार”
21 दिवसात कोरोनाला हरवण्यात देश अपयशी का ठरला?; पी. चिदंबरम यांचा मोदींना सवाल
युद्ध झाल्यास भारत अजिबात जिंकणार नाही- चीन